बंद

टिपेश्वर अभयारण्य

दिशा
श्रेणी नैसर्गिक/मोहक सौंदर्य

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यामधील  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत  विखुरलेले आहे.

हिरव्यागार वनराई मध्ये जवळपास १४८.६३ चौ.कि.मी. मध्ये अभयारण्य व्यापलेले आहे.  आजूबाजूस वसलेल्या खेड्यातील नागरिक इमारती व जळाऊ लाकडासाठी बहुतांशी याच जंगलावर अवलंबून असतात.   उंच डोंगराळ व द-या खोऱ्यांचा भाग असल्या कारणांमुळे याठिकाणी विविध जातीच्या वनस्पती आढळून येतात.

तसेच घनदाट जंगल क्षेत्र असल्या कारणांनी  वेगवेगळे जंगली पशु पक्षी यांचा नेहमी वास असतो. वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, मोर, माकड, नीलगाय, जंगली मांजर ई. प्रकारचे प्राणी या अभयारण्यात आढळून येतात

पर्यटनासाठी उत्कृष्ट कालावधी – एप्रिल-मे

Tipeswar Planner

छायाचित्र दालन

  • मुक्त विहार करताना हरीण
  • नीलगाय ...शिका-याची चाहूल !
  • पाणवठ्यावर आलेले माळढोक पक्षी
  • पाणवठ्यावर असलेला वाघ
  • शिकारीच्या मुद्रेत वाघ
  • निवा-याचा शोधात

कसे पोहोचाल?:

विमानाने

लगतचे विमानतळ सोनेगाव नागपूर (१७२ कि.मी.)

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्टेशन आदिलाबाद (३५ कि.मी. )

रस्त्याने

पांढरकवडा ते अभयारण्य (अंतर ३५ कि.मी.) यवतमाळ-टिपेश्वर (६१ कि.मी.)