बंद

वाहतूक व व्यापार

वाहतूक

रस्ते व रेल्वेमार्ग हे प्रामुख्याने जिल्ह्यातील वाहतुकीचे माध्यमे आहेत.

राष्ट्रीय महामार्ग – नागपूर ते हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून वडकी, करंजी, पांढरकवडा, पाटणबोरी व केळापूर इत्यादी ठिकाणाहून जातो.

राज्य महामार्ग – अमरावती ते चंद्रपूर हा महामार्ग जिल्ह्यातून नेर, यवतमाळ, जोडमोहा, मोह्दा, उमरी, करंजी, व वणी इत्यादी ठिकाणाहून जातो.  नागपूर ते तुळजापूर हा सुद्धा राज्य महामार्ग असून जिल्ह्यातून कळंब, यवतमाळ, आर्णी, उमरखेड इत्यादी ठिकाणाहून जातो.

लोहमार्ग (रेल्वे मार्ग) – यवतमाळ व दारव्हा हि ठिकाणे अरुंद मापी लोहमार्ग (नॅरो गेज रेल्वेमार्ग) वर आहेत.

वणी-वरोरा – वणी हे रेल्वे जंक्शन आहे. येथून एक मार्ग राजूर कडे जातो टर दुसरा चानखा कडे जातो. हा मार्ग दगडी कोळशाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातो. या व्यतिरिक्त, दुसरा मार्ग वणीहून माजरी-वरोरा कडे जातो.

व्यापार

कापूस, सुत, नायलॉन, टाईल्स, चुनखडी व दगडी कोळसा हा जिल्यातून निर्यात केल्या जातो. तसेच अन्नधान्य, चहा, कॉफी, यंत्र सामुग्री, लोह सामुग्री, मोटारी, सायकली, सिमेंट व औषधी इत्यादी वस्तू जिल्ह्यात बाहेरून आयात कराव्या लागतात.

ज्वारी व कापूस हे जिल्यातील मुख्य पिके असून शेंगदाणे व तुरडाळ हे इतर महत्वाचे नगदी पिके होत. कापूस व सागवान हे महत्वाची निर्यातक्षम पिके असून त्यामुळे जिल्हाला सर्वाधिक महसूल मिळतो. इतर निर्यातक्षम वस्तू जसे कापसाचे सुत, चुनखडी, बर्फ, लाकडी समान, जनावरांचे खाद्य, संत्री, दगडी कोळसा व तेंदुपत्ता इत्यादि आहेत.

प्रामुख्याने आयात करावी लागणा-या वस्तू जसे कपडे, यांत्रिक वस्तू, सिमेंट, औषधी इत्यादि. सर्वाधिक वस्तू ह्या नागपूर, मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणाहून आयात केल्या जातात्. या व्यतिरिक्त आठवडी बाजार व यात्रा जिल्यात किरकोळ खरेदी विक्री साठी भरले जातात. यवतमाळ,पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर इत्यादी ठिकाणे हि जिल्ह्यात प्रामुख्याने व्यापार केंद्रे म्हणून गणल्या जातात.