बंद

सहस्त्रकुंड धबधबा

सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात मोडतो. हा धबधबा उमरखेड पासून ७० किलो मीटर वर तर जिल्हा मुख्यालयापासून १८१ कि.मी. अंतरावर आहे. पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसते. ३० ते ४० फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो.

सहस्रकुंड धबधब्याच्या काठावर पर्यटकांसाठी बगीचा तयार करण्यात आला आहे. बागेत विविध रंगाची फुलपाखरे पर्यटकांना मोहिनी घालतात. धबधब्यात मनसोक्त भिजल्यानंतर या बगीच्यात विश्रांती करत धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्याचा आनंद काही औरच. तेलंगणातील अदिलाबाद जिल्हा या धबधब्यालगत असल्याने या पर्यटन स्थळाला तेथील पर्यटकांची जास्त गर्दी दिसते. धबधब्याच्या काठावर असलेल्या पंचमुखी महादेव मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे.

दोन दिवसांच्या पावसाळी पर्यटनात सहस्रकुंड परिसरात पक्षी आणि वन्य प्राण्यांचे वैविध्य पहावयास मिळते. यामुळे पैनगंगेवर धोधो कोसळणाऱ्या या धबधब्यास भेट देऊन परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिल्यास पावसाळी पर्यटन समृद्ध होऊ शकेल.

छायाचित्र दालन

  • पांढ-या शुभ्र पाण्याची संततधार !
  • उन्हाळ्यातील सूर्य प्रकाशातील दृश्य
  • पावसाळ्यातील धबधब्याचा खळखळाट
  • धबधब्याचा भीतीदायक प्रवाह
  • सीमापार पर्यटकांची गर्दी
  • पर्यटकांसाठी पर्वणी...

कसे पोहोचाल?:

विमानाने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर हे जिल्हा मुख्यालयापासून १५१ कि.मी. अंतरावर आहे.

रेल्वेने

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नांदेड येथे मध्य रेल्वे लाईन वर आहे जे १४० कि.मी. अंतरावर आहे.

रस्त्याने

उमरखेड पासून ७० किलो मीटर वर तर जिल्हा मुख्यालयापासून १८१ कि.मी.