बंद

भौगोलिक माहिती

भौगोलिक स्थळ

यवतमाळ जिल्हा हा वर्धा पैनगंगा-वैनगंगा खो-याच्या दक्षिण-पश्चिम भागात वसलेला आहे. भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याचे स्थान १९.२६’ व २०.४२’ उत्तर अक्षांश मध्ये आणि ७७.१८’व ७९.९’पूर्व रेखांशा मध्ये मोडते. उत्तरे कडून अमरावती व वर्धा जिल्हा, पूर्वेकडून चंद्रपूर जिल्हा, दक्षिणेकडे नांदेड जिल्हा व तेलंगाना राज्य  असून पश्चिमेला वाशीम व हिंगोली जिल्हे लागून आहेत .

क्षेत्रफळ

जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३५८२ चौ.कि.मी.(राज्याच्या ४.४१ टक्के) असून २०७७१४४ (राज्याच्या २.६३ टक्के) एवढी लोकसंख्या आहे. लोकसंख्येची घनता १५३ व्यक्ती प्रती चौ.कि.मी. एवढी आहे. राज्याच्या एकूण ३५ जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्याचा क्षेत्रफळाच्या बाबतीत ६वा तर लोकसंख्येच्या बाबतीत १९वा क्रमांक लागतो.

यवतमाळ हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय असून त्याची लोकसंख्या २०११  च्या जनगणनेनुसार ११६५५१ एवढी आहे. यवतमाळ शहर हे जिल्ह्याचा इतर तालुक्यांशी चांगल्या प्रकारच्या रस्त्यांनी जोडले आहे. तसेच जिल्ह्यात रेल्वेची छोटी लाईन सुद्धा वापरामध्ये असून मुर्तीजापुर व इतर शहरांशी त्याने प्रवास करता येतो.

यवतमाळ जिल्हा हा ब-याच प्रमाणात डोंगराळ भाग तसेच रुंद व खोल द-यांनी बनलेला असून समतल भूपृष्ठांनी वेढलेला आहे. संपूर्ण जिल्हा असंख्य पूर्व पश्चिम रांगांनी व्यापलेला आहे. मध्य भाग पठारी असून खूप सरळ बाजूंनी उभा आहे व त्यामुळे समुद्र सपाटी पासून त्याची उंची ३०० ते ६०० मीटर पर्यंत पोहोचल्या गेली. इकडे तिकडे सर्वदूर पहाडी किंवा समतल उंच व अणकुचीदार डोंगरांनी भरलेले दिसतात. हे सर्व भूभाग बेरारच्या दक्षिणी पर्वत रांगांनी तयार झाले आहेत. उत्तरेकडे जिल्हा पायनघाट ज्याला बेरारची दरी म्हणतात पर्यंत वाढलेला आहे. ह्या द-या ६५ ते ८० किलोमीटर रुंद आहेत. याचा छोटासा भाग जो यवतमाळ जिल्ह्यात येतो तो समतळाचा पत्ता म्हणून तयार झाला. ज्याची रुंदी ८ ते २२ किलोमीटर असून ती जिल्ह्याची उत्तरीय सीमारेषा आहे. जिल्हा ढोबळ मानाने खालील सहा भौगोलिक क्षेत्रात विभागल्या गेला आहे.

उत्तरे कडील बेंबळा खोरे व बाभूळगाव तहसील क्षेत्र

वर्धा भूसमतळ जो कि कळंब मधील वर्धा नदी, राळेगाव, मारेगाव व वणी तहसील मध्ये विखुरलेला आहे

यवतमाळ पठार ज्यात बराच भाग यवतमाळ, कळंब, केळापूर, घाटंजी तहसीलचा आहे व काही प्रमाणात बाभूळगाव, राळेगाव व मारेगाव तहसीलचा आहे

दारव्हा पठार ज्यात संपूर्ण दारव्हा तहसील, ब-याच प्रमाणात दिग्रस तहसील, तसेच नेर, यवतमाळ, घाटंजी तहसीलचा काही भाग

पुसद डोंगराळ प्रदेश हा पुसद, महागाव आणि उमरखेड तहसील करिता

पैनगंगा दरी जी जिल्ह्याची दक्षिण सीमारेषा तसेच इतर तहसील चा काही भाग जसे पुसद, उमरखेड, महागाव, दारव्हा, घाटंजी, केळापूर, मारेगाव व वणी

जिल्ह्यातील मुख्य नद्या वर्धा व पैनगंगा ज्या उत्तर-पूर्व सीमारेषेत प्रत्येकी वाहतात. वर्धा नदीचा उगम मध्यप्रदेश मधील मुलताई च्या पूर्वेस होतो. ती सर्वसाधारणपणे दक्षिण-पूर्व दिशेने जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमारेषेत वाहते. वर्धा अशी एकमेव नदी आहे कि काही अंशी दिशादर्शक आहे. तिचे पात्र रुंद असून खोल आहे परंतु पूर परिस्थितीमध्ये नदी काठच्या भागात पाणी शिरून प्राणहानी व वित्तहानी सुद्धा करते. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहते परंतु उन्हाळ्यात मात्र ब-याच ठिकाणी कोरडी असते.बेंबळा व निर्गुडा ह्या वर्धा नदीच्या मुख्य उपनद्या असून जिल्ह्यात दोन्हीही बारमाही वाहतात. बेंबळा नदीचा उमग अमरावती जिल्ह्यात असून शेवटचे ३० किमी.अंतर यवतमाळ जिल्ह्यात कापते. निर्गुडा नदी यवतमाळ जिल्ह्यातच उमग पावते व तिची लांबी जवळ जवळ १६५ किमी. आहे.

पैनगंगा नदीचे उगमस्थान अजंठा पर्वत रंगातील दक्षिण-पश्चिम बुलढाणा शहरात आहे. ती वर्धा नदीची मुख्य उपनदी म्हणून सुद्धा मान्यता पावली आहे. नदी तळ खूप खोल असून तिचा मार्ग बराच नागमोडी स्वरूपाचा आहे पैनगंगा आपल्या संपूर्ण नागमोडी मार्गामुळे जिल्ह्याची दक्षिण सीमारेषा तयार करते. पूस, अ-हा, अडान, वाघाडी व कुंज ह्या पैनगंगेच्या जिल्ह्यातील महत्वाच्या उपनद्या होत.

सीमारेषा

जिल्ह्याची उत्तर ते दक्षिण सर्वदूर लांबी हि १९३ किमी. असून जास्तीत जास्त रुंदी उत्तर ते दक्षिण १६१ किमी. आहे. जिल्ह्य हा बेरारचा दक्षिण-पूर्व १/४ भाग व्यापत असून पश्चिमेला वाशीम व हिंगोली जिल्हे लागून आहेत. उत्तरेला अमरावती जिल्हा असून पूर्वेला वर्धा नदी हि सीमारेषा म्हणून ओळखली जाते त्या दिशेला मध्य परगण्याचे वर्धा व चंद्रपूर जिल्हे लागून आहेत. दक्षिणेकडे नांदेड जिल्हा व तेलंगाना राज्य आहे.मोठमोठे वळणे घेवून वाहणारी पैनगंगा नदी जिल्ह्यासाठी संपूर्ण दक्षिण सीमारेषा तयार करते व शेवटी दक्षिण-पूर्व टोकाशी वर्धा नदीला जावून मिळते.

(स्रोत – यवतमाळ जिल्हा गॅझेटीअर)