पूर्व इतिहास
महारष्ट्रातील इतर जिल्ह्य प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास घटना क्रमानुसार सांगता येणार नाही. तरीही उपलब्द कागदपत्रांच्या मदतीने मूळ इतिहासाचा मागोवा घेतला जाऊ शकतो. खालील विषद घटनाक्रम या बाबतील नक्कीच पूरक ठरतात.
महाभारतातील उपलब्द माहिती नुसार यवतमाळ जिल्हा हा उर्वरित बेरार परगण्याचा भाग असून हे दोन्ही भाग मिळून वैभवशाली विदर्भ राज्याचा एक प्रांत बनला होता. बिदर हे शहर जे कि पूर्वी निजामांच्या अधिपत्याखाली होते, त्या राज्याची राजधानी म्हणून नावारूपास आले.
संगा वंशावळ
ख्रिस्तपूर्व २७२ ते २३१ मधील काळात राजा सम्राट अशोक मौर्य याच्या राज्याचा बेरार हा सुद्धा भाग होता. परंतु कदाचित मौर्य राज्याच्या अध:पतना अगोदर मौर्यांनी स्थानिक चोरांच्या टोळीच्या मदतीने हे राज्य आपल्या ताब्यात घेतले व अशारितीने पुष्यमित्र संगा राज्याचा शेवट केला. पुष्यमित्र हा शेवटचा मौर्य बृहद्रथा याच्या सैन्याचा सेनापती होता. त्याने आपल्या राजाला फितुरीने मारून स्वतःची राजवट उभी केली व विदिशा जे कि सध्याचे भिलाषा या शहराला राजधानी म्हणून घोषित केले. पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र हा नंतरच्या काळात राज्य कारभार पाहू लागला. राज्याच्या सीमा वाढविण्याच्या प्रयत्नात त्याने विदर्भाच्या राज्याशी युध्द करण्याचा प्रयत्न केला व पराजित झाला. शेवटी दोघांमध्ये तह होऊन वर्धा नदीला दोन्ही राज्यामधील सीमारेषा म्हणून मान्य केले. विदर्भाच्या राजाची राजवट व कुळ याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. तसेच पुढे त्याचे साम्राज्य कुठपर्यंत स्थापित झाले याची नोंद सुद्धा दिसत नाही. परंतु ह्या घटनेची नोंद मात्र आढळून आली ज्यामुळे पूर्व बेरारच्या साम्राज्याला त्यावेळी बराच फरक पडला
वाकटक व इतर हिंदू राजवट
यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासाचा शोध घेताना जरी आंध्र, शक, पहालव व बेरारचे यवतमाळ यांचा संबंध विचारात घेणे जरुरी नसले तरी प्रत्यक्षात पूर्ण यवतमाळ जिल्हा जो कि संपूर्ण परगण्यातील काही भाग होता हा वाकटक वंशाच्या साम्राज्या खाली येत होता. या वंशाच्या राजांबद्दल विशेष काही उल्लेखित नाही. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील भांडक या गावात आढळलेल्या माहिती नुसार विचार केला तर यवतमाळ जिल्हा हा शासन दरबारी महत्वाचा मानला जात असे. अजिंठा लेण्यांपैकी १६ क्रमांकाच्या लेण्यामध्ये वाकटकच्या कुटुंबातील ७ सदस्यांची नावे आढळली गेली. तसेच इतर ठिकाणाहून काढलेल्या माहिती नुसार १० राजांपैकी ज्यात फक्त एकच राजा जिवंत राहिला व त्याने नंतर बराच काळ राज्य केले. पहिला राजा विद्याशक्ती ज्याने निरनिराळ्या काळात म्हणजे ख्रिस्त नंतर २७५, ४०० मध्ये सरासरी २५ वर्षे राज्यपद सांभाळले. परंतु ह्या सर्व तारखांमध्ये सुसूत्रता आढळत नाही.
चालुक्य व राष्ट्रकुट यांच्या जिल्ह्यात कुठेही अस्तित्याच्या खाना-खुणा दिसत नाहीत. परंतु पुढे १०व्या शतकाच्या पुढील अर्ध्या भागात मात्र वागपती -२ (मुंजा जो कि माळवा प्रांताचा परमार होता) याच्या राज्यात या बद्दल नोंद आढळते. याचे राज्य दक्षिणेला गोदावरी पर्यंत विखुरलेले होते. परंतु. ९९५ ख्रिस्त नंतर, तैला-२ याने त्याला हरवून माळवा राज्य व बेरार ताब्यात घेतले, अशा प्रकारे पुन्हा ते चालुक्याच्या साम्राज्य खाली आले.
पुढे बाराव्या शतकाच्या शेवटी देवगिरीच्या यादवांनी चालुक्य राज्यामधील बहुतांश उत्तरेकडील जिल्हे ताब्यात घेतले. परंतु यातही शंका आहे की, यवतमाळ जिल्ह्याचा संपूर्ण कि काही भाग ह्या संस्कृतीशी निगडीत आहे. पूर्वेकडील भूभाग कदाचित गोंड जमातींनी ताब्यात घेतला असावा त्यांचे चंद्रपूर जिल्ह्या शेजारी मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे. ज्याचे वरून चालुक्य राजवटीचा शेवट झाल्याच्या खुणा मिळतात.
ब्रिटीश राज्यकर्त्यांना हस्तांतरण
पुढे १८३३ मध्ये यवतमाळ जिल्हा उर्वरित बेरार सोबत ईस्ट-इंडिया कंपनी ला हस्तांतरीत करण्यात आला. यात प्रक्रियेत कोणतीही अडचण उदभवली नाही. पुढे तेव्हा पासून नियमित विकास वगळता इतर कोणत्याही महत्वाच्या घटने बद्दल लिखित गोष्टी आढळत नाहीत.
प्रशासन
बेरारच्या हस्तांतारानंतर त्याचे पूर्व व पश्चिम बेरार अशा दोन जिल्ह्यात विभाजन करण्यात येवून प्रत्येकी अमरावती व अकोला अशी मुख्यालये करण्यात आली. यवतमाळ जिल्हा हा पुसद तालुका वगळून पूर्व बेरार मध्ये समाविष्ट करण्यात आला. परंतु १८६४ मध्ये यवतमाळ, दारव्हा, केळापूर व वणी मिळून स्वंतंत्र जिल्हा स्थापन करण्यात आला व त्याचे नाव प्रथम दक्षिण-पूर्व बेरार व नंतर वणी असे ठेवण्यात आले. जेंव्हा निजामाने बेरार हे भारत सरकारला भाडे पट्ट्या वर दिले तेंव्हा सदर हस्तांतरण १९०३ मध्ये रद्द केले गेले व त्याचे प्रशासन हैदराबाद वरून केंद्रीय परगण्यात बदलण्यात आले. १९०५ मध्ये भाडे पट्ट्याचा कालावधी संपल्यानंतर बेरारच्या सहाही जिल्ह्याची पुनर्बांधणी करण्यात आली व वणी तालुका वाशीम जिल्ह्यातून परत घेण्यात आला जो कि पूर्वी पुसद जिल्ह्यातून विभागल्या गेला होता. त्याच वेळी जिल्ह्याचे नामकरण वणी बदलून यवतमाळ करण्यात आले.
(स्रोत – यवतमाळ जिल्हा गॅझेटीअर)