जिल्हा सांख्यिकी कार्यालय
उद्देश
जिल्हा सांख्यिकी कार्यालय हे जिल्हा स्तरीय कार्यालय असून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अखत्यारीत येते जे कि महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागा अंतर्गत काम करते. नियोजना साठी महत्वाची असलेली जिल्हा स्तरीय माहिती गोळा करण्याचे काम सांख्यिकी कार्यालय करित असते.
प्रसिद्धी :- जिल्हा सांख्यिकी कार्यालय काही महत्वाची पुस्तके प्रसिद्ध करीत असते.
(अ) जिल्ह्याचा सामाजिक व आर्थिक गोषवारा- ह्या पुस्तकांमध्ये जिल्ह्याची महत्वाची सामाजिक व आर्थिक स्वरूपाची माहिती मिळते. ह्या पुस्तकासाठी आवश्यक असलेली माहिती निरनिराळ्या कार्यालयाकडून प्राप्त केल्या जाते.
(ब) नगर परिषदांचे पुस्तक- ह्या पुस्तकामध्ये ब-याच प्रकारची माहिती संपादित केली जसे मिळकत, खर्च, कर्मचारी सद्यस्थिती, कर पद्धती, झोपड्या, कत्तलखाने, व जिल्ह्यातील इतर सर्व नगर परिषदांची महत्वाची सांख्यिकीय माहिती संपादित केली आहे.
(क) तहसीलच्या निवडक बाबी- ह्या पुस्तकामध्ये तहसीलच्या एकूण ४९ बाबी नमूद केल्या आहेत. ज्यामुळे तहसीलच्या सद्दस्थितीची इतर निरनिराळ्या बाबींमध्ये तुलना करता येते.
गणना- याच बरोबर हे कार्यालय कर्माचा-यांची गणनासुद्धा करित असते. दरवर्षी राज्य सरकार, जि.प., व नगर परिषद कर्मचा-यांची गणना या कार्यालया मार्फत होत असते. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील अनुदानित शिक्षण संस्थांमधील कर्मचा-यांची गणना केल्या जाते. त्याच प्रमाणे हे कार्यालय इतर निरनिराळ्या गणने मध्ये भाग घेत असते जसे लोकसंख्या गणना, आर्थिक गणना, पशुधन गणना इ.
राष्ट्रीय आवक- राष्ट्रीय मिळकतिचा अंदाज घेण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व इतर क्षेत्रातील माहिती जमा करण्याचे काम या कार्यालया मार्फत होत असते.
निर्देशांक- राज्यस्तरीय घाऊक व किरकोळ किमतीचे निर्देशांक तपासण्यासाठी ह्या कार्यालया मार्फत माहिती गोळा केली जाते.
मूल्यमापन-निरनिराळ्या सरकारी योजनांचे मूल्यमापन सर्वेक्षण हे कार्यालय करित असते.
नमुना नोंदणी योजना -याचे अंतर्गत जनगणना संचालनालयाला कामासाठी आवश्यक असलेली महत्वाची सांख्यिकीय माहिती (जन्म-मृत्यु दर व स्थलांतर बाबत) गोळा करून पुरविल्या जाते.