बंद

पर्जन्यमान व हवामान

पर्जन्यमान

जिल्यात सरासरी ९११.३४ मी.मी. एवढा पाऊस पडतो. मागील काही वर्षात पावसाच्या अनिश्चिततेमुळे रबी पिका मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.दुस-या बाजूला कधी कधी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पिके नष्ट होतात किंवा संपूर्ण जमीन रखडली जाते. मागील १२ वर्षाचा विचार केला तर योग्य वेळी व योग्य प्रमाणात पाऊस पडला. मागील २५ वर्षात सरासरी जून मध्ये ६ इंच, १२ इंच जुलै मध्ये, ८ इंच ऑगस्ट मध्ये, ७ इंच सप्टेंबर व २ इंच ऑक्टोबर मध्ये पाऊस पडला. तसेच बाकी उर्वरित महिन्यात १ इंच पेक्षा कमी पाऊस पडला. यवतमाळ जिल्हा अमरावती व अकोला जिल्ह्यांपेक्षा अधिक थंड आहे परंतु बुलढाणा पेक्षा थंड नाही. येथे गरम हवेच्या झुळके मुले वातावरण गरम असते. त्यामुळे रात्र थंड असते.

हवामान

सामान्यपणे जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असून हिवाळा बराच थंड असतो. संपूर्ण वर्ष चार ऋतू मध्ये विभागल्या जावू शकते. उष्ण ऋतू मार्च मध्ये सुरु होऊन जूनच्या पहिल्या सप्ताहा पर्यंत राहतो. त्यानंतर लगेच दक्षिण-पश्चिम मौसमी पाऊस लागतो व तो सप्टेंबर च्या शेवटा पर्यंत असतो. ऑक्टोबर व नोव्हेंबर मिळून उत्तरीय पावसाळा बनतो व शेवटी थंडीचा ऋतू लगेचच येतो जो कि फेब्रुवारीच्या शेवटी संपतो.

एकूण वार्षिक पावसापैकी सर्वाधिक पर्जन्यमान दक्षिण-पश्चिम मौसमी पावसा मुळे होते. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पाऊस सारखा राहत नाही. जिल्ह्याच्या पूर्व भागातील वणी मध्ये ११२५ मिमी पाऊस येतो आणि पश्चिमेकडील दारव्ह्या मध्ये ८८९ मिमी तर मध्य यवतमाळ मध्ये १०९९.५ मिमी पाऊस पडतो. साधारणपणे जसजसे आपण पश्चिमे कडून पूर्वे कडे जातो तस तसे पावसाचे प्रमाण वाढत जाते.

उन्हाळा ऋतू हा मार्च ते मे च्या दरम्याण असून दिवस व रात्रीचे तापमान सतत वाढत जाते. मे हा साधारणपणे वर्षातील अतिउष्ण महिना असतो सरासरी दैनंदिन तापमान ४२ अंश सिल्सिअस वर पोहोचते व एकदा का दक्षिण-पश्चिम मौसमी पाऊस सुरु झाला कि तापमानात घट होऊन वातावरण एकदम आल्हाददायक बनते. जसा जसा पावसाळा संपायला लागतो, तसे तसे दिवसाचे तापमान वाढायला लागून रात्रीचे तापमान कमी होते. नोव्हेंबर च्या शेवटापासून दिवस व रात्रीचे तापमानात एकदम घट होते. डिसेंबर हा वर्षातील सर्वात थंड महिना असून सरासरी दैनंदिन किमान तापमान १३ अंश सेल्सिअस होते. उत्तरेकडील थंड हवेच्या लहरीमुळे कधी कधी जिल्ह्यातील तापमान ५ अंश सेल्सिअस पर्यंत पडते.

पावसाळा ऋतूमध्ये हवे मध्ये आर्दता येऊन आकाश काळे कुट्ट ढगांनी व्यापले जाते. उर्वरित वर्षात मात्र हवा कोरडी राहून आकाश निरभ्र वा थोड्या फार ढगांनी अच्छादलेले असते.

दैनंदिन पर्जन्यमान व इतर माहिती

तहसील व मंडळ निहाय दैनंदिन पर्जन्यमान बद्दलची माहिती मागील काळापासून जतन करून ठेवण्यात आली आहे. विविध प्रकारचे अहवाल या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. महील काही वर्षांमध्ये पडलेल्या पावसाची आकडेवारी जतन करून ठेवण्यात आली आहे. या करिता सदर लिंक वर क्लिक करा.