जिल्हा निवडणूक अधिकारी यांचा संदेश
हे पोर्टल प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्याचे मतदार आणि निवडणूक विभाग, यवतमाळ यांच्यातील संवाद साधण्यासाठी बनविण्यात आले आहे. हे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व अधिनस्त कार्यालयांकडून निवडणूक विषयक चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल मतदारांसाठी माहिती प्रदान करते. डाऊनलोड करण्याच्या उद्देश्याने निवडणूक विषयक विविध महत्वाची माहिती देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, यांच्या संपूर्ण देखरेखीखाली आणि नियंत्रणाखाली काम करते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी (७६), राळेगाव(७७), यवतमाळ(७८), दिग्रस(७९),आर्णी(८०), पुसद(८१) आणि उमरखेड(८२) असे एकूण सात विधानसभा मतदार संघ आहेत.
आगामी विधानसभा निवडणूकीत मोठ्या संख्येने व निर्भीडपणे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा.