बंद

कसे पोहोचाल?

रस्त्याने :-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक मधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय महामार्ग – नागपूर ते हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून वडकी, करंजी, पांढरकवडा, पाटणबोरी व केळापूर इत्यादी ठिकाणाहून जातो.

राज्य महामार्ग – अमरावती ते चंद्रपूर हा महामार्ग जिल्ह्यातून नेर, यवतमाळ, जोडमोहा, मोह्दा, उमरी, करंजी, व वणी इत्यादी ठिकाणाहून जातो.

नागपूर ते तुळजापूर – हा सुद्धा राष्ट्रीय महामार्ग (204) असून जिल्ह्यातून कळंब, यवतमाळ, आर्णी, उमरखेड इत्यादी ठिकाणाहून जातो.

 

रेल्वे द्वारे :-

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन धामणगाव (रेल्वे)  येथे मध्य रेल्वे लाईन वर आहे जे जिल्हा मुख्यालयापासून ४९ कि.मी. अंतरावर आहे.

जिल्ह्यातील वणी रेल्वे स्टेशन १०३ कि. मी. अंतरावर आहे.

तसेच जिल्हा मुख्यालयापासून बडनेरा (अमरावती) (८३ कि.मी.)  रेल्वे जंक्शन आहे.

यवतमाळ व दारव्हा हि ठिकाणे अरुंद मापी लोहमार्ग (नॅरो गेज रेल्वेमार्ग) वर आहेत.

 

विमानाने  :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर हे  जिल्हा मुख्यालयापासून १५१ कि.मी. अंतरावर आहे.